Tuesday, August 23, 2022
Homeशिरोडकर्स कन्स्ट्रक्शन आणि इंटेरियर्स कुडाळ.... "वास्तूची रचना जी तुमच्या मनात घर करेल"....!. आता
            

शिरोडकर्स कन्स्ट्रक्शन आणि इंटेरियर्स कुडाळ.... "वास्तूची रचना जी तुमच्या मनात घर करेल"....!. आता

 भारतीय संघ बुधवारी तिसऱ्या आणि निर्णायक ट्वेन्टी-२० आंतरराष्ट्रीय क्रिकेट लढतीत न्यूझीलंडचा सामना करेल, तेव्हा संघाचे लक्ष्य मालिकेत विजय मिळवण्याचे असेल. या सामन्यात भारताच्या शीर्ष फळीतील फलंदाजांकडून संघाला चांगल्या कामगिरीची अपेक्षा असेल.

रोहित शर्मा, विराट कोहली आणि लोकेश राहुल यांसारख्या अनुभवी खेळाडूंच्या अनुपस्थितीत शुभमन गिल, इशान किशन आणि राहुल त्रिपाठी यांना संधीचा फायदा उचलता आलेला नाही. बुधवारी सामना झाल्यानंतर बराच काळ भारत ट्वेन्टी-२० आंतरराष्ट्रीय सामना खेळणार नाही. त्यामुळे युवा खेळाडूंना ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या मालिकेत आपली छाप पाडण्याची अंतिम संधी असेल. बांगलादेशमध्ये द्विशतक झळकावल्यानंतर इशानला लय कायम राखता आलेली नाही. तर, फिरकी गोलंदाजीचा सामना करताना गिललाही अडथळय़ांचा सामना करावा लागत आहे. गिल एकदिवसीय क्रिकेटमध्ये चांगल्या लयीत असला तरीही, ट्वेन्टी-२० क्रिकेटमध्ये त्याला लय सापडलेली दिसत नाही. तिसऱ्या स्थानी फलंदाजी करणाऱ्या कोहलीच्या अनुपस्थितीत मिळालेल्या संधीचा फायदा त्रिपाठीला मिळवता आलेला नाही.
मालिकेतील खेळपट्टय़ांबाबत टीका होत असल्याने नरेंद्र मोदी स्टेडियममध्ये पुन्हा एकदा फिरकी गोलंदाजांना अनुकूल खेळपट्टी मिळते की नाही याकडे सर्वाचे लक्ष असेल. गोलंदाजी विभागात यजुर्वेद्र चहल आणि कुलदीप यादव एकत्र खेळल्यास भारताला विरोधी संघांवर दबाव निर्माण करण्यास मदत मिळताना दिसत आहे. दुसऱ्या ट्वेन्टी-२० सामन्यात फिरकीला अनुकूल खेळपट्टीवर केवळ दोन षटके गोलंदाजी केल्याने अनेकांच्या भुवया उंचावल्या आहेत. चहलने गेल्या सामन्यात आक्रमक सलामी फलंदाज फिन अ‍ॅलनलाही बाद केले होते. वेगवान गोलंदाज अर्शदीप सिंगने गेल्या सामन्यात चांगली गोलंदाजी केली होती. मालिकेत पुनरागमन करणाऱ्या पृथ्वी शॉ ला संधी देण्याची मागणी होत असली तरीही, निर्णायक सामन्यात कर्णधार हार्दिक पंडय़ा अंतिम एकादशमध्ये बदल करण्याची शक्यता कमीच आहे.
दुसरीकडे, न्यूझीलंडला आपल्या मध्यक्रमाकडून चांगल्या कामगिरीची अपेक्षा असेल. ग्लेन फिलिप्सने अजून फलंदाजीत चमक दाखवलेली नाही आणि संघाला अखेरच्या सामन्यात त्याच्याकडून योगदानाची अपेक्षा असणार आहे. एकदिवसीय मालिकेत आपल्या खेळीने सर्वाचे लक्ष वेधणारा मायकल ब्रेसवेल मोठे फटके मारण्यास सक्षम आहे. न्यूझीलंडने गेल्या सामन्यात आठ गोलंदाजांचा उपयोग केला होता. दोन वर्षांपूर्वी या मैदानावर खेळवण्यात आलेल्या ट्वेन्टी-२० सामन्यात २०० हून अधिक धावा झाल्या होत्या.

Leave a comment

If you have an account your address will be used to display your profile picture.

error: Content is protected !!